पुणे

ससाणेनगर वाहतूककोंडी बाबत उपाययोजना व्हावी शिवसेना प्रभाग क्र 23 च्या वतीने निवेदन वाहतूककोंडी बाबत उपाययोजना करणार – राजेंद्र जाधव

ससाणेनगर वाहतूककोंडी बाबत उपाययोजना व्हावी
शिवसेना प्रभाग क्र 23 च्या वतीने निवेदन
वाहतूककोंडी बाबत उपाययोजना करणार – राजेंद्र जाधव
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
हडपसर (प्रतिनिधी)
ससाणेनगर नवनाथ चौक येथील सिग्नल व वाहतूक समस्यांबाबत शिवसेना प्रभाग क्र.23 च्यावतीने हडपसर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले. येथील वाहतूककोंडी सोडविण्याबाबत राजेंद्र जाधव यांनी सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
ससाणेनगर नवनाथ चौक येथील सिग्नल कधी चालू तर कधी बंद असतात. अशा परिस्थितीमुळे सिग्नल चालू असला तरी कोणी सिग्नल पाळत नाही. त्यामुळे वाहतूक समस्या ही गंभीर समस्या होऊन बसली आहे. नवनाथ चौक ससाणेनगर येथे तातडीने दोन वाहतूक पोलीस कायम स्वरूपी उपलब्ध करून घ्यावेत याबाबत चर्चा करण्यात आली. निवेदन शिवसेनेचे प्रभागप्रमुख अमित गायकवाड यांनी पुढाकार घेऊन दिले.वतीने यावेळी जेष्ठ शिवसैनिक प्रभाकर कदम, काळेपडळ शाखाप्रमुख गणेश जगताप हे उपस्थित होते. यासाठी मार्गदर्शन माजी आमदार महादेव अण्णा बाबर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, गट प्रमुख समन्वयक जानभाई शेख, विभाग प्रमुख प्रशांत पोमण, उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर, जेष्ठ शिवसैनिक दौलत सावंत, चंद्रकांत सातव, राजाभाऊ होले, राजेंद्र डांगमाळी आणि शिवसेना प्रसिद्धी प्रमुख राजेश शेलार यांनी मार्गदर्शन केले.
हडपसरची लोकसंख्या व वाहनांची संख्या खूप वाढली आहे, त्यातच रस्ते मात्र अपुरे पडत आहेत,
हडपसर मधील वाहतूक प्रश्न गंभीर बनला आहे, नागरिकांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सहकार्य करावे, नागरिकांचा संहभाग असेल तर प्रश्न सुटण्यास मदत होईल.
राजेंद्र जाधव
पोलीस निरीक्षक – वाहतूक विभाग
हडपसर

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x