“शंभर एकरावर भव्य मंडप… मंत्री, खासदार, आमदार आणि उद्योजकांना निमंत्रण…
सध्या राज्यभरात चर्चेत आहे इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही लग्नसोहळा!
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील चिलप यांचा मुलगा साहिल याच्यासोबत संगमनेरच्या गुंजाळवाडीत पार पडणार आहे.
या लग्नासाठी तब्बल 100 एकर परिसरात आलिशान तयारी करण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जोरदार तयारी सुरू असून राज्यातील मोठमोठे राजकीय नेते आणि कीर्तनकार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे… साधेपणाचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज यांच्याच शाही लग्नसोहळ्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे.
‘लग्न आणखी जोरात करणार… काय बोंबलायचंय बोंबला!’ असं म्हणत महाराजांनी टीकाकारांनाही आधीच उत्तर दिलं होतं.”
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं शाही लग्न! 100 एकरावर भव्य तयारी, मंत्री-खासदारांना निमंत्रण
