पुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 24KM ट्रॅफिक जाम

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज प्रचंड वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल झाले…
वाहनांच्या तब्बल 24 किलोमीटर लांब रांगा लागल्या आणि हजारो प्रवासी रणरणत्या उन्हात अडकून पडले!

महाराष्ट्र दिनाची सुट्टी आणि त्याला जोडलेला विकेंड…
पर्यटनासाठी निघालेल्या हजारो गाड्या एकाच वेळी एक्सप्रेस वेवर आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.

त्यातच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे एक मार्ग बंद करण्यात आला…
आणि इथेच वाहतुकीचं नियोजन पूर्णपणे कोलमडलं!

खालापूर टोलनाक्यापासून बोरघाटापर्यंत वाहतूक ठप्प…
घाटात हाफ क्लचवर गाड्या चालवल्याने अनेक वाहनं बंद पडली आणि कोंडीत आणखी भर पडली.

उन्हाचा तडाखा, पाण्याची कमतरता, एसी बंद…
या सगळ्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले.
अनेक जण पिण्याच्या पाण्यासाठी इतरांकडे मदत मागताना दिसले.

या कोंडीत खासदार सुप्रिया सुळे देखील तब्बल दोन तास अडकल्या…
त्यांनी व्हिडीओ शेअर करत परिस्थिती दाखवून दिली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना वारंवार 25 मिनिटांचे ब्लॉक्स घ्यावे लागले…
तर सरकारने टोल न घेण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे संतप्त प्रवाशांनी सरकारवर टीका केली…
“उद्घाटनाचे नियोजनच मिसिंग होते,” अशी प्रतिक्रिया उमटली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकाराबद्दल माफी मागितली…
आणि भविष्यात ‘मिसिंग लिंक’मुळे ट्रॅफिकची समस्या कमी होईल, असा दावा केला.

पण प्रश्न अजूनही कायम आहे—
अशा मोठ्या प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी वाहतुकीचे योग्य नियोजन का होत नाही?