पुणे

साने गुरुजी आरोग्य केंद्रात स्पेशल आयुर्वेद ओपीडीचे उद्घाटन ; प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते झाले उदघाटन

साने गुरुजी आरोग्य केंद्रात स्पेशल आयुर्वेद ओपीडी चे उद्घाटन
प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते झाले उदघाटन
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये आठ स्पेशल आयुर्वेद ओपीडी चे उदघाटन प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते नुकतेच झाले. आरोग्य केंद्र मधील रुग्णांची संख्या पाहता या नवीन ओपीडी मुळे रुग्णसेवा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. विविध व्याधींवर विशेष तज्ञांचा सल्ला व उपचार येथे उपलब्ध होईल. या कार्यक्रमात महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षात आतापर्यंत झालेले कार्यक्रम व स्पेशल ओपीडी बद्दल माहिती डॉ. प्रणिता जोशी देशमुख यांनी दिली. रोटरी क्लबच्या सदस्यांनी त्यांची मनोगते व्यक्त करून प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.
या स्पेशल आयुर्वेद ओपीडीसाठी रोटरी क्लब ऑफ फोर्ट कोलींस ब्रेकफास्ट (अमेरिका), रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटी, फार ईस्ट, पुणे सेंट्रल, हडपसर, viabrant ईस्ट, लक्ष्मीरोड, गणेश खिंड यांचा सहभाग आहे.
या कार्यक्रमास विनोद पाटील, संदेश सावंत, रूजिंदर बेरी, डॉ. राजेश पवार, डॉ. गजेंद्र बकाल, सचिव अनिल गुजर, डॉ. सुशील देशमुख, डॉ. प्रणिता जोशी देशमुख, डॉ. निलाक्षी प्रधान व रोटरीचे रोटेरियन्स आदी उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x