पुणे

शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांचा मदतीचा हात ; पीडित कुटुंबाला स्वतः जाऊन केली मदत

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
प्रभागातील आगीत नुकसान झालेल्या कुटूंबासाठी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला, प्रभाग एक कुटुंब मानून मदत केल्याने नगरसेवकांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सनराईज सोसायटी, ई.सी.पी वास्तू, हांडेवाडी रोड या ठिकाणी सातवा मजला, फ्लॅट न ७०४ / डी २ मध्ये दि.०२ मार्च २०२० रोजी सांय. सुमारे ९:०० ते ९:३० च्या सुमारास शाँर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली, बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. योगा योगाने घरातील सर्व मंडळी जेवण झाल्या नंतर शतपावली करण्यासाठी गार्डन मध्ये गेले होते. काही वेळातच सातव्या मजल्यावर लागलेल्या आगीचे धूर आणि ठिणग्या पाहून घरातील लोकांनी आपल्या फ्लॅटकडे धाव घेतली. तेव्हा आपल्या फ्लॅटमध्ये आग लागली हे त्यांना समजले, त्यानंतर शेजारील रहिवाशीच्या मदतीने पाण्याच्या पाईपने व बादल्यानी आग विजवण्याचा प्रयत्न् सुरु केला. नंतर चेअरमन कल्पक बोरसे व नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी अग्निशमन दलाला फोन लावताच काही वेळातच अग्निशमन दलाचे जवानांनी आग विझवण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली. अर्ध्या तासामध्येच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश प्राप्त झाले.

हा संपूर्ण प्रभागच माझे कुटुंब आहे, असे मानणारे प्रभाग क्र २६ मधील लोकप्रिय नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वतः जावून पिडीत कुटुंब वासियांची भेट घेत त्यांचे सांत्वन करीत रोख २५,००० रुपयांचा रोख धनादेश त्यांच्या स्वाधीन केला. तसेच संबंधित महावितरण चे अधिकारी व पोलीस अधिकारी यांना संपर्क करुन लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्यास विनंती केली. व रंगोटी साठी लागणारे साहित्य देण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी कुटुंबातील सदस्य भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यातील आनंदआश्रू अनावर झाले. मूळ गाव भोपाल ( मध्यप्रदेश ) असलेले कुटुंब प्रमुख जितेंद्र चौधरी हे सध्या कामासाठी बाहेर गावी आहेत ते पोहचण्या आगोदरच ही मदत पोहचल्यामुळे. कुटुंबियांनी नानां सारखा कुटुंब प्रमुख लाभला असे आमचे भाग्यच आहे. अशा भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी सोसायटी चेअरमन कल्पक बोरसे, सेक्रेटरी गिरिश बाबर व सोसायटीचे सर्व सभासद तसेच अथर्वपूर्वा सोसायटीचे सभासद बशीर सय्यद, आयुब पठाण, गुलाब शेख यांनी अग्निशमन दलाचे जवान व प्रभाग क्र २६ चे कुटुंब प्रमुख नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांचे आभार व्यक्त केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x