पुणे

Breking news : पुण्यात स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा प्रताप; मोबाईल चार्जिंगच्या निमित्ताने घरात प्रवेश केला अन तरूणीचा केला विनयभंग…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल चार्जिंग करण्याच्या निमित्ताने डिलिव्हरी बॉयने घरात प्रवेश मिळविला. थोडया वेळाने त्याने गप्पा मारल्यानंतर त्याने त्या मुलीला विचित्र हावभाव करण्यास सुरुवात केली. आणि तिला काही समजण्याच्या आतच तिला स्पर्श करून शरीर सुखाची मागणी केली. अश्लील हावभाव करत तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती अतिशय घाबरली आणि आरडाओरड केला त्यावेळी त्याने तिथून पळ काढला.

 

वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात २६ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार स्विगीच्या डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोसायटीत आणि परिसरात चांगलाच गोंधळ झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी स्विगीवरून घरगुती साहित्य मागवले होते. ते साहित्य आले. चेक करताना त्यात सॅनिटरी पॅडची पॅकिंग फोडल्याचे आढळून आले. त्यांनी स्विगीकडे तक्रार केली. त्यानंतर स्विगीकडून संबंधित तरुणीला नवीन सॅनिटरी नॅपकिन देण्यास आरोपी डिलिव्हरी बॉयला पाठविले. डिलिव्हरी बॉय घरी आला व त्याने सॅनिटरी नॅपकिन देऊन पैशांची मागणी केली. तेव्हा तरुणीने तुम्ही स्विगीशी बोलून घ्या असे सांगितले. त्यावर संबंधित डिलिव्हरी बॉयने मोबाईल चार्जिंग करण्याचा बहाणा करून त्यांच्या घरात प्रवेश मिळविला. तसेच, त्यांना तरुणीला अश्लील बोलून करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे खडकी पोलिसांनी स्विगी बॉय वर ताबडतोब गुन्हा दाखल केला. पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.