प्रतिनिधी- स्वप्नील कदम
खंडाळा (सातारा) तालुक्यातील निंबोडी गावचे श्री सतिश नाना कारंडे यांचे सुपुत्र विठ्ठल कारंडे हे सध्या पुणे शहर पोलीस दलात आपले कार्य बजावीत आहेत . त्यांना लहान पणापासून धावण्याची आवड आहे. त्यांनी पोलीस दलात भरती झाल्यापासून ते आजपर्यंत धावणे हा छंद जोपासत ९ जून २०२४ मध्ये साऊथ आफ्रिका येथिल ९० किलोमीटर अंतराची कॉम्रेड मॅरेथॉन ही ८ तास ५५ मिनटात पूर्ण करून बिल रोवन हे मानाचे पदक पटकावले.
नंतर त्यांनी सलग ४ महिने अथक परिश्रम घेऊन आपले दैनंदिन कर्तव्य बजावत नवी दिल्ली येथे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करत ४२ .१९५ किलोमीटरची फुल मॅरेथॉन २ तास ५८ मिनिटांत पूर्ण करून सम्पूर्ण स्पर्धकांमध्ये ४० वी रँक व वयोगटात २१ वी रँक मिळवून अमेरिका देशातील बोस्टन येथे होणाऱ्या जागतिक बोस्टन मरेथॉन ला निवड होऊन भारताचे प्रतिनिधित्व आणि पुणे पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करण्याची अतिशय सुवर्ण संधी त्यांना मिळाली. त्यांच्या या यशाच्या पाठीमागे त्यांच्या सूज्ञ पत्नी सौ सुजाता कारंडे यांची अतिशय मोलाची साथ मिळाली.
गेली २ वर्षांपासून प्रशिक्षक श्री रोहन कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रशिक्षण घेत आहेत. तसेच फलटण चे सुपुत्र श्री जोतिराम चव्हाण सरांचे सुद्धा खूप चांगले मार्गदर्शन मिळाले .
गेल्या २ महिन्यापासून हडपसर चे नामांकित डॉक्टर योगेश सातव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्रशिक्षण चालू आहे आणि येत्या २०२६ ची बोस्टन मॅरेथॉन ची तयारी ते डॉक्टर योगेश सातव सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार आहेत.