पुणे

शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी ६४.५० कोटींचा निधी मंजूर: खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

नारायणगाव – राज्याच्या जुलैच्या पुरवणी बजेटमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर व हवेली तालुक्यातील ६४.५० कोटींच्या कामांना मंजुरी मंजुरी देण्यात आली.

 

काल विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या पार्श्वभूमीवर जुलैच्या पुरवणी अंदाजपत्रकात शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी मतदारसंघातील विविध तालुक्यातील कामांचे प्रस्ताव दिले होते. त्यापैकी जुन्नर तालुक्यातील खोडद, नारायणगाव, वारुळवाडी ते तालुका हद्द रस्ता प्रजिमा-२८ कि.मी. १०/०० ते १३/८०० च्या काँक्रिटीकरणासह सुधारणा करण्यासाठी रु. ५०० लक्ष, निमदरी सावरगाव गुंजाळवाडी रस्ता प्रजिमा-१५६ कि.मी. ०३/०० ते १२/०० मध्ये लहान पुलासह रस्ता सुधारणा करणे रु. ६०० लक्ष, प्रजिमा- ४ ते निमगाव सावा जांबूत रस्ता प्रजिमा-९ कि.मी. ८/१०० ते ८/५०० व कि.मी. १०/०० ते १४/५०० मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे रु. २५० लक्ष, खडकी भागडी, आळे, बोरी, शिंगवे रस्ता प्रजिमा- २१ कि.मी. २७/५०० ते २९/०० चे रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करणे रु. ३०० लक्ष आणि नारायणगाव ओझर ओतूर रस्ता रा.म.१२८ वरील कि.मी. ५५/०० ते ५६/३०० मधील रस्त्याच्या भूसंपादनासाठी रु. २५०२ लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव नारोडी कळंब निरगूडसर लोणी सविंदणे रस्ता प्रजिमा-१३ कि.मी. ४४/५०० ते ४५/०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम व रस्त्याची भौमितिक सुधारणा करणे (भाग-लोणी गावाजवळ) रु. १५० लक्ष तर शिरुर तालुक्यातील मलठण, ढोकसांगवी, करडे, निमोणे रस्ता प्रजिमा-१४४ कि.मी. १५/०० ते १६/८०० रुंदीकरण व मजबुतीकरण करणे व कि.मी. १५/०० येथे लहान पुलाचे बांधकाम करणे (भाग- कारेगाव ते करडे) रु. २५० लक्ष, चौफुला वढु बु. कोरेगाव भीमा डिग्रजवाडी टाकळीभीमा निमगाव म्हाळुंगी रांजणगाव गणपती प्रजिमा-१९ कि.मी. ५७/१०० ते ५९/४०० रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रु. ३०० लक्ष, वाघोली भावडी तुळापूर आपटी वढु सणसवाडी प्रजिमा-१६६ कि.मी. २०/३६० ते २५/९६० मध्ये रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (भाग – सणसवाडी ते तळेगाव ढमढेरे) रु. ५०० लक्ष आणि हवेली तालुक्यातील थेऊर, तारमळा ते काकडेमळा, पेठ, उरळीकांचन, खामगाव टेक, शिंदेवाडी रस्ता प्रजिमा-१३८ कि.मी. २१/७०० ते २३/०१० रस्ता सुधारणा करणे रु. ४०० लक्ष, पेरणे डोंगरगाव पिंपरी सांडस न्हावी सांडस सांगवी रस्ता प्रजिमा-२९ कि.मी. ०/०० ते ५/०० मध्ये रस्ता सुधारणा करणे करणे रु. ३०० लक्ष आणि पेरणे डोंगरगाव पिंपरी सांडस न्हावी सांडस सांगवी रस्ता प्रजिमा-२९ कि.मी. ५/०० ते १०/०० मध्ये रस्ता सुधारणा करणे करणे रु. ४०० लक्ष अशा एकूण ६४.५० कोटींच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक रस्त्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील किमान एका तरी महत्वाच्या रस्त्यासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. मी सुचविलेल्या कामांपैकी ६४.५० कोटींची कामे मंजूर झाली करण्यात आली आहेत. त्याबद्दल राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण या दोघांचेही आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही जवळपास ६५-७० कोटींचा निधी अजितदादा पवार यांनी मंजूर केला होता. त्यामुळे मतदारसंघातील पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्यात आपल्याला यश मिळाले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा कायमच माझा प्रयत्न राहिला आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.