पुणे

धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानतर्फे पालखी मार्गावर वारकऱ्यांना खिचडी, शिधा व भगवद्गीतेचे वाटप

पुणे (प्रतिनिधी)

“वारी ही ज्ञानाची गंगा, भक्तीची ती शृंखला
शेवटच्या दिंडीपर्यंत सेवा हाच मज मार्ग झाला
शब्द देतो पांडुरंगा, विसरू न येईल तुझा
तुकारामाच्या नामात रंगे, हृदय माझं वारकऱ्यांचं!”

“दिनांक २२ जून २०२५”, अखंड वारीची परंपरा “माझ्या राजानं चालू ठेविली”, या ओळींना अनुसरून धर्मवीर संभाजी राजे युवा प्रतिष्ठान मांजरी या मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील दिंड्यांमध्ये भव्य सेवा उपक्रम राबवला.

सालाबादप्रमाणे या वर्षी देखील मंडळाच्या वतीने शाबुदाणा खिचडीचे वाटप, तसेच ५५० पॅकेट्स सुकी शिधा (फरसाण भेळ व बिस्कीट पुडे) वारकऱ्यांना वितरित करण्यात आले. या सेवा कार्याच्या माध्यमातून अनेक भाविकांना अन्नदानाच्या पुण्यसंपादनाचा लाभ झाला.

याशिवाय दिंडी मधील विणेकाऱ्यांना श्रीमद् भगवद्गीतेचे वाटप करण्यात आले. धार्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणारा हा उपक्रम वारकऱ्यांमध्ये विशेष भावनात्मक आपुलकी निर्माण करणारा ठरला.

या वेळी धर्मवीर संभाजी राजे युवा प्रतिष्ठान मांजरी मंडळाचे सर्व पदाधिकारी पूर्ण ताकदीने उपस्थित होते आणि त्यांनी या सेवेची पूर्ण जबाबदारी निभावली.

ही सेवा म्हणजे फक्त अन्नदान नाही, तर भक्ती आणि संस्कृतीच्या जतनाचा भाग आहे — ही भावना या उपक्रमातून ठळकपणे दिसून आली.