पुणे

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक “जालिंदर कुंभार’ यांच्या  आयुष्यावर आधारित कहाणी  ” साथ दे तू मला “

पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन) मराठी सिरीयल आणि मराठी कुटुंब यांचं एक नवीननातं तयार झालं आहे . मराठी चॅनेल्सवरील मालिकाप्रेक्षकांच्या मनात घर करून जातात . कधी पोट धरूनहसवणारे तर कधी विचार करायला लावणारे असे विषयप्रेक्षकांसमोर मांडले जातात ११ मार्च पासून अशीच विचारकरायला लावणारी नवीन मालिका ” साथ दे तू मला ” प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे . या मालिकेचा ट्रेलर सध्या स्टारप्रवाहवर प्रेक्षकांची उत्कंठता वाढवतो आहे.

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक जालिंदर कुंभार हेपुन्हा एकदा मनाला टोचणारा विषय घेऊन “साथ दे तू मला”या मालिकेचे दिग्दर्शन देखील करत आहेत . विषेश म्हणजे यामालिकेची कथा हि फक्त प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठीकाल्पनिक आधार घेऊन रंगवलेली नाही तर जालिंदर कुंभारयांनी त्यांचे आयुष्यच यावेळी पडद्यावर आणले आहे . अर्थातत्यांच्याच रियल लाइफला त्यांनी रील लाइफ मध्ये उतरवलेआहे.

२००३ पासून कलाक्षेत्रात पदार्पणकेल्यानंतर आव्हानांना सामोरे जाताना २००८ मध्ये त्यांनीसर्वप्रथम स्वतंत्रपणे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कामकरायला सुरुवात केली . २००९ मध्ये झी मराठीवरील”अनुबंध” हि त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका…  “सरोगसी” सारखा विषय या मालिकेतून प्रेक्षकांपुढेआणण्याचे आव्हान त्यांनी पेलल… सई ताम्हणकर , भार्गवीचिरमुले , तुषार दळवी , स्मिता तांबे अशा नावाजलेल्याकलाकारांची साखळी या मालिकेपासूनच सुरु झाली . सईताम्हणकर आणि स्मिता तांबे सारख्या कसलेल्या अभिनेत्रीमराठी चित्रपट सृष्टीला मिळाल्या.

२०१० मध्ये गिरीजा ओक स्टारर “लज्जा” हि मालिका देखील अशाच एका विषयावर होती कि , जोविषय सामान्यतः मराठी घरांमध्ये चर्चिला जात नाही . तिचीलाज हि संपूर्ण घराण्याची , समाजाची लाज असते पण तीलाज जपण्याची जबाबदारी हि केवळ तिचीच असते . जालिंदर कुंभार दिग्दर्शित या मालिकेत गिरीजा ओकसहमुक्ता बर्वे , नीना कुलकर्णी , विनय आपटे यांनीही कसदारअभिनय केले.

२०१४ मध्ये आलेल्या ” का रे दुरावा ” यामालकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले . “तीचं” आणि “त्याचं” नातं हे चार भिंतीत पती-पत्नीचं पण बाहेर केवळ एकाऑफिस कलीगचं … आजच्या जगात संसाराचा गाडारेटण्यासाठी पतीच्या बरोबरीने नोकरी करणारी पत्नी अनेकभूमिका पार पडताना दिसते . हि कहाणी आज अनेकींचीआहे . पत्नी , मैत्रीण , सून , मुलगी अशा अनेक नात्यांनावेगवेगळ्या साच्यात बसवून निभावताना तिच्यासह “त्याची” देखील होणारी तारेवरची कसरत हि अनेक चवींनी संसारचविष्ट करणारी असते . हि मालिकाही कधी हसवणारी , कधीरडवणारी , इर्षा , मत्सर , आपुलकी अशा अनेक भावनांनीरंगवलेली होती . “का रे दुरावा” या मालिकेला २०१५ सालच्याझी मराठी अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेसह ९ अवॊर्डसमिळाले

   “इ” टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका”कालाय तस्मै नमः” आणि “अनामिक” या मालिकांचेदिग्दर्शनाचे नामांकनही जालिंदर यांना मिळाले . आता पुन्हा एकदा अशीच एक कहाणीघेऊन लेखक दिग्दर्शक जालिंदर कुंभार प्रेक्षकांच्या मनालाभिडणारी मालिका घेऊन येत आहेत . साथ दे तू मला यामालिकेच्या निमित्ताने ते सांगतात कि , हि केवळ मालिकाचनाही , तर यावेळी त्यांचेच स्वतःचे आयुष्य पडद्यावर तेस्वतःच दिग्दर्शित करीत आहेत . आयुष्याने अनेक उतारचढाव दाखवले . परिस्थितीने दिलेला प्रत्येक घाव “साथ दे तूमला” या मालिकेची चौकट बांधतात .एखाद दुसरं अपवादवगळता ‘साथ दे तू मला’ मधील सगळ्याच व्यक्तिरेखा यामाझ्या आयुष्यातील आहेत. आणि आजही माझ्या आसपासआहेत. काहींना मी ओळखतो, काहींना मी ओळखत नाहीपण मी त्यांचा फॉलोअर आहे. काहींना तुम्ही आणि मी आपणदोघे ओळखतो…हो, तुमच्यातल्याही आहेत.काही माझ्याभूतकाळातील, काही वर्तमानातील. काही आता या जगातनाहियेत, काही अजूनही जिवंत आहेत. काहींनी त्रास दिलाय, काहींनी खूप मदत केली, खूप प्रेम केलं माझ्यावर. तुम्ही, मी, आपल्या सगळ्यांनाच आणलंय यावेळी कथानकात. इनफॅक्टत्यांच्यामुळेच या कथेतलं जग उभं राहिलंय आणि हे असंमाझ्याकडून पहिल्यांदाच घडतंय असं ते हणाले .

 जालिंदर कुंभार हे नेहमीच वास्तवआयुष्यावर भाष्य करणाऱ्या विषयांनाच प्रेक्षकांसमोरआणतात . आजच्या या सोशल मीडियाच्या लाईफमध्येमाणसं आयुष्य जगण्यापेक्षा, आला दिवस ढकलायचा कसायाचा विचार करण्यात वर्तमान गमावतात . पण आपल्यालेखणीतून जालिंदर यांनी आयुष्यातलं माणूसपण”जगण्याला” , “जगवण्याला” आणि “जागवण्याला” महत्वदिले आहे .” अनुबंध ” , ” लज्जा ” , “का रे दुरावा” सारखेच”साथ दे तू मला” या मालिकेतून आपली रिअल लाइफ त्यांनीरील लाइफ मध्ये उतरवून पुन्हा एक समाजिक संदेश देऊनसमाजाची मानसिकता बदलण्याचा घाट घातला आहे . कथानकातील बहुतेक घटना माझ्या आयुष्यात प्रत्यक्षातघडलेल्या असल्या , तरी नेमक्या कोणत्या घटनेमुळे कथालिहावी वाटली ते 10 तारखेला सांगेन असे जालिंदर यांनीसांगितले . त्यामुळे नक्की असं काय घडलं? हे जाणूनघेण्यासाठी हि मालिकाचा पाहावी लागेल.

   ” साथ दे तू मला “चा ट्रेलर सध्या झीमराठीवर मालिकाप्रेमींचे लक्ष वेधत आहे . अगदी काहीसेकंदातच या मालिकेच्या गाभ्यातील एक नस प्रेक्षकांचीउत्कंठता वाढवते . सध्या लग्नासाठी बोहल्यावर उभेराहण्यापूर्वी “ती” देखील तिचे स्वप्न जगण्याचा अधिकारमागते … अगदी निरागस पणे संसाराची गोडी चाखताना , माझेही आयुष्य मनापासून जगाचे स्वप्न ती त्याला सांगते . हित्याची आणि तिची कहाणी पुढे अनेक नात्यानं जन्म देते , आणि मग पुन्हा सुरु प्रवास आयुष्याचा … आज अनेकींचीचनाही तर प्रत्येक लग्नाळू मुला मुलीची हि कहाणी पाहायलाविसरू नका ११ मार्च पासून सायंकाळी  ७ : ३० वाजता स्टारप्रवाह वर , ” साथ दे तू मला ” …

0 0 votes
Article Rating
7 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments