हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु सुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्य एंजल कॉलेज ऑफ ऑफ फार्मसी यांच्याकडून मोफत आरोग्य सेवा वारकऱ्यांसाठी आयोजीत केली होती. हयादरम्यान हजारो भाविकांनी मोफत चेकअप व मोफत औषधे यांचा लाभ घेतला. सर्दी, ताप, खोकला, अंगदुःखी, थकवा या आजारावर मोफत तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात आले, हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी महत्वाची भूमिका बजावली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, संचालक अविनाश सेलूकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भागवत चव्हाण यांनी मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे सांगितले व प्रत्येक वर्षी अशीच सेवा वारक-यांना देण्यात येईल असे सांगितले.