पुणेहडपसर

हडपसर – मुंढवा कार्यालय परिसरात अतिक्रमणावर धडक कारवाई; ४२ पथारी स्टॉल्ससह अनेक अडथळे हटवले

हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून चिंतामणी नगर भाजी मंडई ते हांडेवाडी रोड या मुख्य मार्गावरील अनधिकृत व्यावसायिकांवर आज जोरदार कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, मध्यवर्ती भरारी पथक, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या समन्वयाने राबवण्यात आली. सार्वजनिक जागेवर अडथळा निर्माण करणाऱ्या आणि पादचाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या हातगाड्या, पथाऱ्या, शेड, इतर व्यावसायिक अडथळे यांचे निर्मूलन करण्यात आले.

या कारवाईसाठी खालील प्रमाणे यंत्रणा तैनात करण्यात आली होती:
महाराष्ट्र सुरक्षा बल: ०५ जवान पोलीस कर्मचारी: २, मध्यवर्ती (भरारी) पथकाचे कर्मचारी यांचा सहभाग होता.

 

हडपसर-मुंढवा अतिक्रमण विभागाचे:
अतिक्रमण निरीक्षक राकेश काची
सहायक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंढे, साईनाथ निकम, अभिलाष कांबळे, वामन सुद्रिक, माधव बहिरम, मध्यवर्ती पथकाचे सहाय्यक निरीक्षक राकेश सोनवणे, निशांत सावंततुषार कदम
संपूर्ण कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त संदीप खलाटे आणि महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
हातगाडी – ०६, स्टॉल – ०१, स्टील शॉरमा काउंटर – ०२, पथारी – ४२, इतर व्यावसायिक, अडथळे – १७, शेड – १५, कारवाईत याचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील नियमित व सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक रस्ते, बाजारपेठा आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी अशा मोहीम आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.