पुणे

विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक सामाजभान रुजवणारी व्यवस्था निर्माण व्हावी : प्रा. डॉ. मिलिंद कसबे ; अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

आजचा तरुण आपल्या सांस्कृतिक जाणिवांना विकसित करणाऱ्या या मोठ्या अभ्यासक्षेत्रापासून फार दूर गेल्याचा अनुभव येतोय. ही पिढी आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाला समजून घेणाऱ्या आणि आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीकडे डोळसपणे पाहण्याच्या स्वजाणिवेलाही मुकते की काय? अशी भीती अलीकडे वाटू लागली आहे. म्हणून ज्ञानक्षेत्रात रोबोटिक बनू पाहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शैक्षणिक आचरणात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक सामाजभान रुजवणारी व्यवस्था निर्माण व्हावी. असे प्रतिपादन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी व्यक्त केले.

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे पिंगोरी येथे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमाचे दुसरे पुष्प प्रा.मिलिंद कसबे यांनी गुंफले. त्यांनी ‘आजचा युवक आणि समाजभान’ या विषयावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. विलास आढाव, मुळशी तहसीलच्यानायब तहसीलदार विशाखा आढाव, प्रा. डॉ. संगीता साळवे उपस्थित होते.

 

सामाजशील व्यक्तिमत्त्व विकास घडवण्यासाठी विद्यार्थ्याला समाजात जावं लागेल समाजाचे दैनंदिन प्रश्न, समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधता आले पाहिजे.” असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.

प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.सविता कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन लगड, डॉ. नाना झगडे, प्रा. गौरव शेलार, डॉ अंजू मुंढे, डॉ.वंदना सोनवले, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. गणपत आवटे, अक्षय कोकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले. आभार प्रा. नितीन लगड यांनी मानले.