पुणे

पुण्यातील धक्कादायक घटना!लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार;तसेच 12 ते 13 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे :आपण दोघे लवकरच लग्न करु आणि सुखाने राहू आणि संसार करू असे म्हणत लग्नाचे आमिष दाखवत कोथरूड येथे राहणाऱ्या एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला आर्थिक अडचणी सांगत 17 तोळे सोन्याचे दागिने घेऊन अंदाजे बारा ते तेरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने कोथरूड पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रसाद सावंत (वय 38, रा. रामबाग कॉलनी, कोथरुड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 29 वर्षीय तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि प्रसाद सावंत यांची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाली. सावंतने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले.आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच आर्थिक अडचण असल्याची बतावणी करुन त्याने तरुणीकडून 17 तोळे सोन्याचे दागिने व एक लाखाच्यावर रोख स्वरूपात पैसे वेळोवेळी उकळले असल्याचे तरुणीने सांगितले आहे.

 

तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा सावंत याने तरुणीला प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे मुलीने लग्नाचा त्याच्याकडे तगादाच लावला त्यावेळी मात्र त्याने तीला धमकावले व तिला मारहाण केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुलीने कोथरूड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्यावर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अडागळे पुढील तपास करत आहेत.