पुणे

Crime news : वानवडीमध्ये हॉटेलच्या वादातून निवृत्त पोलीस निरीक्षकावर खूनी हल्ला; हल्ला करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये एका निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.जखमी झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे ( नाव वजीर शेख वय वर्ष 60 ) असे आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी ( ईशा वजीर शेख वय वर्ष 56 ) यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलच्या जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

वानवडीत निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी हॉटेलसाठी जागा भाडे तत्वावर घेतली असून त्यासंदर्भात शेख आणि जागा मालक यांच्यात वाद चालू होता त्यातून यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी जागामालकास अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता वानवडी येथील काकडे मैदानावर घडली होती. याप्रकरणी प्रमोद काकडे (वय ४५, रा. वानवडी बाजार) याला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी भादवी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईशा वजीर शेख (वय ५६, रा. ब्रम्हा आंगण सोसायटी, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वजीर शेख यांनी वानवडी येथील संविधान चौकात नेचर एग्रो टुरिझम हॉटेल सुरु केले आहे. यासाठी शेख यांनी दहा वर्षाच्या भाडेकराराने जागा घेतली आहे. काकडे याची तेथे जागा होती. मात्र भाडेकरार केला नव्हता. वजीर शेख यांनी काकाडे याच्याकडे भाडेकराराबाबत विचारणा केली. पण, काकडे भाडेकरार न करता शेख यांच्याकडून वारंवार पैसे घेत होता. आरोपी काकडे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री आरोपी आणि शेख हे चर्चा करत असताना आरोपीने वाद घातला. त्यावेळी काकडे याने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून शेख यांच्यावर हल्ला केला. शेख यांच्या तोंडावर तीन ते चारवेळा दगड मारुन त्यांना गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरील प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.