पुणे

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कानिफनाथ गडावर विधी महाविद्यालयाकडून वृक्षारोपण

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 22 जुलै रोजी असणार्‍या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर तर्फे कानीफनाथ या गडा जवळ वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबवण्यात आला.

हडपसर पुणे येथील विधी महाविद्यालयाने 18 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता कानीफनाथ या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

यामध्ये विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

 

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी जवळच्या नर्सरीतून विविध प्रकारचे झाडे मागवण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रंजना पाटील यांनी हार पुष्पहार व नारळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यानंतर विधीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्राचार्य तसेच शिक्षकांच्या नेतृत्वाखाली कानीफनाथ परिसरातील जागेवर रोपांची लागवड केली तसेच त्यांना पाणी देऊन त्यांच्या संरक्षणासाठी रोपांना मातीचे कठडे बांधण्यात आले.

 

यावेळी बोलताना प्राचार्या डॉ रंजना पाटील यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, यावर भाषण दिले त्यांनी भाषणातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम व्यवस्थित पणे पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले तसेच,प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी विनंती आपल्या भाषणात केली.

कार्यक्रमाची सांगता दुपारी दोन वाजता राष्ट्रगीताने झाली.