पुणे

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी दीपक उर्फ जोजो टीब्बा बाबुराव सरवदे यासअतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली शिक्षा

लोणी काळभोर, : उरुळी देवाची परिसरमधून घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी एका अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना में २०२४ रोजी घडली होती. या गुन्ह्याचा लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपुर्वक तपास करून आरोपीला अटक केली होती. या अट्टल दुचाकीचोराला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने १ वर्ष समश्र कारावासासह ५हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जानवी भाटीया यांनी दिले आहे.

दीपक उर्फ जोजो टिंबा बाबुराव सरवदे (वय २२, रा. मांजरी खुर्द, ता. हवेली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंबादास झाटे (वय- ४०, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास झाटे हे उरुळी देवाची परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची दुचाकी घराबाहेर पार्किंग केली होती. मात्र अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना में २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी झाटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात ‘भारतीय दंड संहिता’ कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संभाजी देवीकर करत होते.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलीस हवालदार संभाजी देवीकर यांनी उरुळी देवाची परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र आरोपी आढळून आला नाही. त्यानंतर त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, सदर चोरी ही जोजो टिंबाने केली असल्याचे तपासात निष्पन झाले होते. मात्र आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. मात्र आरोपी जोजो टिंबा हा हडपसर येथे येणार आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा खटला हा शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारच्या वतीने अॅड. श्रीधर जावळे यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात पोलिसांनी सादर केलेले पुरावे व अॅड. श्रीधर जावळे यांनी केलेले युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला एक वर्ष समश्र कारावास व ५हजार रुपयांच्या दंडाची व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जानवी भाटीया यांनी दिले आहेत.

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास आरोपीला अटक केली. तसेच त्याच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले. यामुळे एका वर्षाच्या आत या गुन्ह्याचा निकाल लागला असून आरोपीला शिक्षा झाली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच पुणे शहर पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांकडून लोणी काळभोर पोलिसांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडत आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी देवीकर, कोर्ट पैरवी महिला पोलीस अंमलदार लक्ष्मिबाई यादव व सर्जेराव धडस यांनी केली आहे.