पुणे

तरुणांचा बस मध्ये धिंगाणा, आणि बस पोहचली डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये प्रभात रोडवरील प्रकार, पाहा नेमके काय घडले…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या तरुणांनी बसमध्ये गोंधळ घालत तिकीट काढण्यास नकार दिला खरा पण, वाहकाने बस थेट पोलीस चौकीत नेऊन या तरुणांची मस्तीच उतरवली. प्रभात रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला असून, या तरुणांना पोलिसी भाषेत सज्जड भाषेत समज दिल्यानंतर त्यांची माफी मागितली. बस प्रवाशांनी चालक आणि वाहकाने दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले. पण, या सर्वप्रकरणात प्रवाशांना नाहक त्रासाला जामोरे जावे लागले.

 

तरुणांचा बसमध्ये बसल्यावर कंडक्टरला तिकीट काढण्यास नकारत्याच झाल असं, शनिपार ते नीलज्योती (गोखलेनगर) मार्गावरील बस गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गोखलेनगरकडे निघाली होती. बस डेक्कन जिमखाना येथील गोखले स्मारक चौकातील थांब्यावर बस आली. तेव्हा तरुणांचे टोळके बसमध्ये बसले. या टोळक्यातील काही तरुण गोंधळ घालत होते. त्यातच वाहकाने त्यांच्याकडे तिकिटाची विचारणा केली असता तरुणांनी तिकिट काढणार नाही, असा आदेशच वाहकाला दिला. तसेच, आमच्या चौकातून बस जाते. तिकिट काढण्यास सांगू नका. नाहीतर तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी त्यांनी वाहकाला दिली. वाहकाने समजावून सांगितले.

 

बस थेट प्रभात रस्त्यावरील पोलीस चौकीत तरीही त्यांनी तिकीट काढले नाही. त्यानंतर टोळक्याचा गोंधळ सुरू झाला. बस विधी महाविद्यालय रस्त्यावर आल्यानंतर सतर्कता दाखवत वाहकाने चालकाला इशाराने बस पोलीस चौकीत नेण्यास सांगितले. चालकाने प्रभात रस्त्यावरील पोलीस चौकीच्या दारात थांबवली. दारातच बस थांबल्याने पोलीस कर्मचारी बाहेर आले. वाहकाने त्यांना घडल्याप्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत तरुणांच्या लक्षात हा प्रकार आला. काही तरुणांनी पळ काढला. पण, त्यातील एकजण पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती लागला.

 

पोलिसांनी पकडलेल्या तरुणाला त्या इतरांना बोलवण्यास सांगितले. तरुण आल्यानंतर त्यांना योग्य त्या भाषेत समज दिला. तसेच, पुन्हा असा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला. बसध्ये दररोज गोंधळ डेक्कन भागातील नदीपात्रात ढोल-ताशा पथकांचा सराव सुरु आहे. या पथकातील तरुण बसध्ये दररोज गोंधळ घालतात, असे वाहक आणि चालकाने सांगितले. चालक आणि वाहकाच्या तत्परतेचे प्रवाशांनी कौतुक केली. टोळक्याच्या गोंधळामुळे अन्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.