पुणे

पुणेकरांना मोठा दिलासा! चांदणी चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला;नितीन गडकरींच्या हस्ते उदघाट्न…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणं पुलाचे उदघाट्न झाले आणि वाहतूक कोंडीपासून त्रस्त असलेल्या पुणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला. शहरातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असून यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकर, आमदार राहुल कुल, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढील 50 वर्षांचा विचार करुन अत्याधुनिक पद्धतीने पुण्यातील चांदणी चौक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला जवळपास दीड लाख वाहने या उड्डाणपुलावरून सुसाट धावू शकतील. या पुलासाठी १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यात सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे चांदणी चौकात नवा उड्डाणपूल बांधण्याची योजना पुढे आली होती. त्यानंतर ऑगस्ट 2017 मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पण काही कारणास्तव हे काम रखडले होते. 2019 मध्ये प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. येथील काम आणखी सोयीस्कर होण्यासाठी मागच्या वर्षी चांदणी चौकातील जुना पूल ब्लास्ट करून पाडण्यात आला होता. जमीन हसतांतरनाच्या अनेक प्रकारच्या अडचणी येत असल्यामुळे भूमिपुजनानंतर तब्बल 6 वर्षांनी हे काम पुर्ण झाले असून आज रोजी त्याचे उद्घाटन झाले आहे.त्यामुळे पुणेकर आनंदी झाले आहेत.