पुणे

स्वच्छ अभियान या स्पर्धेत पुणे शहराचा ही नंबर लागला असता पण… मक्तेदारी असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार – सफाई कर्मचाऱ्यांना सण नाही का? मग कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार द्या – शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे – (प्रतिनिधी)
पुणे शहरात प्रचंड प्रमाणात शहरात कचरा होत असतो पण सफाई कर्मचारी व स्वच्छ विभाग हे आपल्या कर्तव्याचे पालन नियमित करत असतात या सर्व साफसफाई कर्मचारी यांचं वर्ष भर एकच ध्येय असते ते म्हणजे आपल्या पुणे शहराचे नाव स्वच्छ अभिमान मध्ये देशात पाहिले यावे, पण या मध्ये तुम्ही सर्व्हे किंवा अभ्यास केला तर या रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचारी यांची कोणत्याही प्रकारची चूक नाही …
या मध्ये प्रशासन दोषी आहे. असे निदर्शनास येतेय, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी सणासुदीला दिवे लावायचे असतील तर रखडलेला पगार पालिकेने करावा अशी आग्रही मागणी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.
दोन दोन महिने कामगारांचे वेळेवर पगार देत नाही हे कामगार नियमितपणे सणसूद असो किंवा कोरोना सारखे महा भयंकर संकट… सकाळी 4 वाजता उठून कर्मचारी आपल अडचणी ना सामोरे जाऊन आपली जबाबदारी पार पाडतात. ज्या जागेवर साफसफाई साठी पोहचावे लागते त्या ठिकाणी वैयक्तिक रिक्षा भाड देऊन जावे लागते,तसेच सकाळी आपल्या खिशातील खर्चानी चहा घ्यावा लागतो, 4 वाजता उठून नाष्टा तर दूर जेवण पण नाही बनवू शकत. यांना वडापाव खाऊन मेहनत करावी लागते. या मध्ये अनेक भागांत यांना तेथील नागरिकांच्या उलट सुलट प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. तसेच काही संबंधित मुकादम यांना कर्मचारी यांच्या कौटुंबिक अडचणी वर मात करण्यासाठी मोबदला द्यावा लागतो. हे सर्व असेच चालेल तर आपण कोरोना काळात ज्यांना आपण देव कोरोना योद्धा मानत होतो त्याचा वर आज उपास मारीची वेळ आली आहे, तब्बल दोन ते तीन महिने पगारच कंत्राटदार देत नाही हे धोरण योग्य नाही,
आपला परिसर स्वच्छ तर आपले कुटुंब सुरक्षित. यावर नक्कीच तातडीने प्रशासन यांनी निर्णय घेऊन संबंधित अधिकारी यांच्या वर कार्यवाही करून या सर्व सफाई कर्मचारी यांचा पगार नियमितपणे करावा अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे, सणासुदीच्या काळात वेळेत पगार झाला नाही तर आमच्या स्टाईलने उत्तर द्यावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हक्काच्या सुविधा द्या अन्यथा …
कंत्राटी सफाई कर्मचारी यांचा पगार नियमित व्हावा पीएफ नियमितपणे जमा व्हावा, तसेच कित्येक वर्ष आरोग्य अधिकारी एकाच ठिकाणी कार्य करत असल्याने त्यांची मक्तेदारी खूप प्रमाणात वाढली आहे त्यांची तातडीने बदली करावी व पुढील काळात पुणे शहर देशात नंबर 1 चे भारत स्वच्छ अभियान मध्ये प्रथम येईल यासाठी प्रयत्न करावे. पालिकेतील या गलथान कारभाराची तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असा इशारा नाना भानगिरे यांनी दिला आहे.