पुणे

“लोककल्याण प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य उल्लेखनीय – जनार्दन महाराज जगनाडे” “13 नवरत्नांचा लोककल्याण पुरस्काराने सन्मानित

हडपसरः विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तीमत्वाला शोधून पुरस्कार रुपाने प्रोत्साहीत करुन इतरांनाही त्या पासुन प्रेरणा मिळावी हे लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांचे कार्य सामाजिक बांधिलकीची जाणीव करुन देते असे प्रतिपादन संत संताजी महाराज यांचे १४ वे वंशज जनार्दन महाराज जगनाडे यांनी केले.
लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतिने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या नवरत्नांचा १३ वा ” लोककल्याण साधना गौरव ” पुरस्कार देवुन जगनाडे महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते व्यासपिठावर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी,उपाध्यक्ष दिलीप भामे,प्रा.एस.टि.पवार,इंद्रपाल हत्तरसंग,रमेश निवंगुणे,अमित हरपळे,सचिन गायकवाड,अजय कुदळे आदि उपस्थित होते.

लोककल्याण समाज साधना गौरव पुरस्कार – डॉ.सुनिल घागरे,ज्ञान साधना – महादेव शिवरकर,क्रिडा साधना – तानाजी देशमुख,उद्योग साधना – सागर पिलाणे,धर्म साधना – महादेव कदम,सहकार साधना – दिपक जवंजाळ,पत्रकार साधना – वसंत वाघमारे,कला साधना – लखन कसबे तसेच मातृ-पितृ गौरव श्री व सौ.छाया शामकुमार वेदपाठक यांना प्रदान करण्यात आले.पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह,मानपत्र,शाल,श्रीफळ असे होते.
पुरस्काराला उत्तर देताना शामकुमार वेदपाठक व महादेव कदम म्हणाले आम्ही नवरत्नांनी केलेल्या कार्याची पोहोचपावती या पुरस्कार रुपाने आम्हाला मिळाली.भविष्यात आम्ही अधिक जोमाने कार्य करु.
कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ होले, प्रास्ताविक दिलीप भामे,सुत्रसंचालन प्रदिप जगताप तर आभार वर्षा शेंडे यांनी मानले.