पुणे

मराठी भाषेचा अभिमान बाळगावा : प्राचार्य ए. डी.अभंग – साधना स्कुल

पुणे/ हडपसर (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)
मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे आणि मराठी भाषा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे.प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगावा असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य ए.डी.अभंग यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने साधना विद्यालयाचे प्राचार्य ए.डी.अभंग बोलत होते. यानिमित्ताने ओंकार शिंदे, अद्वैत गंधट, अमर नवबादे, सोमनाथ काटे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आर.डी.सोनावळे, व गायकवाड पी.के.यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.बी.कुलकर्णी, पर्यवेक्षक डी.डी.सुर्यवंशी, जे.एन.दाभाडे, एम.वाय.कांबळे, सांस्कृतिक प्रमुख एस.के.रूपनवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.डी.पाषाणकर यांनी केले. सूत्रसंचालन ए.एस.वाव्हळ यांनी केले. तर आभार मराठी विभागप्रमुख पी.एस.केंगले यांनी मानले.

0 0 votes
Article Rating
12 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments