पुणेमहाराष्ट्र

नरेंद्र मोदी हे फक्त अदाणीचे पंतप्रधान आहेत;आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांचा घणाघात…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांची पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नाना पेठ येथे आप महाराष्ट्रकडून महासंकल्प जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या जनविरोधी धोरणांवर, मोदींच्या हुकूमशाही कारभारावर, देशभरामध्ये द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावर खासदार संजय सिंह यांनी सभेच्या माध्यमातून भाजपा सरकारला प्रश्न विचारले आहेत.

दिल्ली आणि पंजाब मध्ये जे परिवर्तन झाले आहे ते महाराष्ट्रात नक्की होणार आहे हा माझा विश्वास आहे, आम आदमी पार्टीने मोठ मोठ्या पार्टीना घाम फोडण्याचे काम केले आहे, शेतकऱ्याचा मुलगा मुलगी ही आप पक्षातून आमदार आणि खासदार बनू शकतात, दिल्लीने आम आदमीचे जीवन बदलेले आहे, नरेंद्र मोदींना फक्त ईडी सीबीआयच्या जीवावर सरकार बनवायची सवय लागली आहे, जनतेला भाजपाने एकमेकांशी जातींच्या आधारे लढवण्याचे काम केले आहे,अदानीने सर्व देशच विकत घेतला आहे, आकाशात गेले विमान अदानीचे, समुद्र अदानीचा, कोळसा अदानीचा यामुळे नरेंद्र मोदी फक्त अदानीचे पंतप्रधान आहेत.

भाजपाच्या सरकारमध्ये शेतकरी आज चिंतेत आहे, आम आदमी महागाईने खाईत लोटला गेला आहे, भाजपाच्या डोक्यात गेलेली सत्तेची लालसा आपल्याला झाडूने साफ करायची आहे, महाराष्ट्रात पेपर लीक होत आहेत सर्विकडे भ्रष्टाचार फोफावला आहे, म्हणून व्यवस्था परिवर्तन करण्यासाठीं आम आदमी पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार आहेत.

आम्ही ज्यांना मतदान केले त्यांनी आम्हाला फक्त काळोख दिला आहे, आता आम्हाला चांगले शिक्षणाची, दवाखान्यांची आवश्यकता आहे,आम्हाला आता शेतकरी, कामगार, महिला विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी लढायचे आहे, अरविंद केजरीवाल यांच्या स्वप्नांचा महाराष्ट्र बनवायचा आहे त्यासाठी सर्वांना कष्ट उपसावे लागणार आहेत, आज आम आदमी पार्टी नसती तर आमचा आवाज कोण ऐकणार होते, परंतु आम आदमीसाठी आम्ही आहोत.

या सभेत प्रमूख उपस्थितीतांमध्ये राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, धनंजय शिंदे, संघटक मंत्री अजित फाटके, संदीप देसाई, नविंदर अहलुवालिया, रियाज पठाण, अजित खोत, हनुमंत चाटे, मनिष मोडक, भूषण धाकुलकर, राज्य मिडिया प्रमूख चंदन पवार, सोशल मिडिया प्रमूख कनिष्क जाधव, मुकुंद किर्दत ईत्यादी राज्य पदाधिकारी उपस्थित होते. या सभेसाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, विशेष म्हणजे या सभेसाठी महिलांची संख्या मोठया प्रमाणात होती, सभेमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल होती ढोल ताशांच्या गजर, बाळ सवंगडी विठू माऊलीचा आणि हरिनामाचा जयघोष करीत होती.