पुणे

लोककल्याण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी यांची सोलापूर ब्राम्हण महासेवा संघ अध्यक्षपदी निवड

हडपसर (प्रतिनिधी)-

फुरसुंगी तुकाई दर्शन येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोककल्याण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी यांची सोलापूर ब्राम्हण महासेवासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या संघाच्या पंचवार्षिक कार्यकारिणी निवडणूकीत ते बिनविरोध निवडून आले. त्यानिमीत्त तुकाईदर्शन येथिल श्री स्वामी समर्थ मंदिरात लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोककल्याण प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य जनार्दन चव्हाण,चंद्रकांत वाघमारे,पांडुरंग शेंडे,तुकाराम घोडके,मोरेश्वर कुलकर्णी प्रविण होले, वैशाली होले,पद्मिनी माने,मंगल लोणकर,लता कुलकर्णी आणि सदस्य उपस्थित होते.
अतिशय सर्वसामान्य कुटूंबातून जन्मलेल्या हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी आपले शिक्षण सोलापूर येथिल ब्राम्हण समाज सेवा संघाच्या वस्तीगृहात राहुन पुर्ण केले,व त्याच संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.त्यांनी त्यांच्या जिवन कार्यकाळात सेवाभावी वृत्तीनं सामाजिक बांधिलकी जपत वाटचाल केली.पुणे येथिल लोककल्याण पतसंस्थेचा सचिवपदीही ते कार्यरत आहेत.सोलापूर ब्राम्हण महासेवासंघाच्या अलिकडच्या काळातील जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार यावेळी बोलताना लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी काढले.