पुणे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समाजासाठी जगले. : प्राचार्य दत्तात्रय जाधव

हडपसर (वार्ताहार)

 स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगणारे काही लोक असतात. स्वतःचा संसार न करता समाजाचा संसार ते करतात. शरीराने या विभूती आज आपल्यात नसल्या तरी आपल्या कार्यारूपाने त्या सदैव समाजाला प्रेरणा देतात . कर्मयोगी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजसेवा केली.शिक्षण प्रसार,समाजसेवा ,अस्पृश्यता उद्धार,हे जणू त्यांचे व्रत होते.महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे खऱ्या अर्थाने समाजासाठी जगले.
असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.
गायकवाड वेदांत, सानप प्रणव, शिवानंद सावळे या विद्यार्थ्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कविता सुर्यवंशी, भानुदास पाटोळे, मोनल रावळ यांनी शिक्षक मनोगतात विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समग्र जीवनाची माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपमुख्याध्यापिका योजना निकम,
पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, कुमार बनसोडे, माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे, आजीव सेवक अनिल मेमाणे,
सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा कांबळे यानी केले.सूत्रसंचालन संगीता रूपनवर व शीला बोडके यांनी केले.तर आभार अनिल वाव्हळ यांनी मानले.