पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश रिक्षा मालक-चालकांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे ! काँग्रेस नेते मा.आमदार मोहन जोशी यांची मागणी

 पुणे – (प्रतिनिधी)
लॉकडाऊनच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने रिक्षा वाहतुकीला बंदी केली. परंतु या महिनाभराच्या काळात रिक्षा मालक-चालकांचे उत्पन्न बुडाले. त्यांना आर्थिक समस्या जाणवू लागली. तरी त्यातून दिलासा मिळण्यासाठी प्रत्येक रिक्षा मालक-चालकांना सरकारने पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी आणि महाराष्ट्र रिक्षा मालक-चालक महासंघाचे सरचिटणीस नितीन पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात दहा लाख आणि पुण्यात सुमारे एक लाख रिक्षा मालक, चालक आहेत. त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रिक्षा व्यवसायाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. लॉकडाऊनचा एक महिन्याचा काळ होऊन गेला. या काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. रिक्षा व्यवसाय आणखी अनिश्चित काळपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने त्यांची हलाखीची स्थिती होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरुन निघण्यासाठी राज्य सरकारने त्यांना पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे असे मोहन जोशी आणि नितीन पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
राज्य सरकारने बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य दिले. त्याचप्रमाणे रिक्षा मालक-चालकांच्या मागणीचाही सहानुभूतीने विचार करावा असे जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x