पुणे

धकाधकीच्या काळात “हॅपी थेरेपी नागरिकांना विकारमुक्त करण्यास बांधील ; चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संजय अण्णा सातव यांचे गौरवोद्गार

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
धकाधकीच्या जीवनात अनेक विकारांचा सामना करावा लागत असताना हॅपी थेरेपी सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना शारीरिक व मानसिक दिलासा देण्याचे कार्य घडत आहे, शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी ही थेरेपी म्हणजे काळाची गरज आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संजय अण्णा सातव यांनी केले.
हडपसर मधील हॅपी थेरेपी सेंटर च्या चौथ्या वर्धापनदिन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी हॅपी थेरेपी सेंटर चे धीरज पाटील, हॅपी मेडिकेअर रिजनल डायरेकटर धनंजय पाटील, धनराज पाटील, दिपराज मोहिते, अभिजित मगर, आबा पवार, पंडित मोडक, हेमंत काळे, विठ्ठल राऊत, ज्ञानेश्वर आवताडे, पांडुरंग घुले, छाया दांगट, सुधाकर पराते आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या चार वर्षांपासून अनेकांना विकारातून मुक्ती देण्यासाठी धीरज पाटील मोफत थेरेपी काम करत आहेत याबद्दल संजय अण्णा सातव यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हॅपी थेरेपी सेंटरला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.