पुणे

महागणेशोत्सव या शासनाच्या संकल्पनेनुसार लोणी काळभोर पोलीसांतर्फे विशेष व अनाथ विद्यार्थ्यांना आरतीचा सन्मान, सामाजिक बांधिलकीची उत्तम संकल्पना

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर – गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा याबाबत महाराष्ट्र शासनाव्दारे आदेश जारी करण्यात आले त्यानुसार
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी राज्य उत्सव गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांची रुपरेषा आखली त्याप्रमाणे दररोज विवीध प्रकाराचे उपक्रम व कार्यक्रम राबवुन जनजागृतीचे दर्शन समाजाला दाखवण्याचे काम केले आहे.

याचाच एक भाग म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दि. ३१/०८/२०२५ रोजी सकाळी १०/०० वा. लोणी काळभोर पोलीस ठाण्या तर्फे सकाळच्या गणपती आरतीचा सन्मान विशेष (मतिमंद) विद्यार्थ्यांना देवून त्यांना सम्मानीत करण्याचा व समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचे काम लोणी काळभोर पोलिसांनी केले आहे. महाविर निवासी मतिमंद विद्यालय लोणी काळभोर येथील विद्याथ्यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने गणपती आरतीचा मान देवून त्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली, अशाप्रकारे मतिमंद विद्यार्थ्यांना योग्य सन्मान देऊन लोणी काळभोर पोलीसांनी सामाजीक बांधीलकी जपली व त्याद्वारे समाजामध्ये एक चांगला संदेश पोहचवला.

तसेच दि. ३१/०८/२०२५ रोजी रात्री ०७/०० वा. लोणी काळभोर पोलीस ठाणे तर्फे सायंकाळच्या गणपती आरतीचा सन्मान जेष्ठ नागरीक ग्रामस्थांना व कुंजीरवाडी ग्रामस्थांना देऊन त्यांना सम्नानीत करण्यात आले. सदर प्रसंगी सर्व जेष्ठ नागरीकांनी पोलीसांप्रती अतिशय कृतज्ञता व सद्‌भावना व्यक्त करुन अशाप्रकारचा उपक्रम आजपर्यंतच्या कालावधीत पहिल्यांदाच राबविला जात असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरीकांना तसेच समाजातील प्रत्येक घटकास पोलीस ठाण्याच्या गणेशोत्सवात सहभागी करुन पोलीसांनी सामाजीक सलोख्याचे उत्तम दर्शन घडवुन दिले असल्याचे जेष्ठ नागरीकांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. या उपक्रमांमुळे लोणी काळभोर परिसरातील ग्रामस्थांमध्ये पोलीसांप्रती सकारात्मकतेची चर्चा होताना दिसुन येत आहे.

सदर गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याव्यतिरिक्त रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, स्त्रीयांवरील अत्याचार प्रतिबंधासंदर्भातील एकपात्री नाटक, व्यसनमुक्ती संदर्भात नाटकाव्दारे जनजागृती कार्यक्रम, मोबाईल अतीवापराचे दुष्परीणाम या विषयावर पथनाटय, सायबर क्राईम संदर्भात व्याख्यान प्रत्येक दिवशी घेऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे.

पुणे शहर पोलीस दलातर्फे पहिल्यांदाच अशाप्रकारचा आगळा वेगळा कार्यक्रम व उपक्रम राबिवीला जात असुन त्याबाबत सर्वसामान्य नागरीकांकडुन चांगली प्रतिक्रीया येत आहेत. तसेच नागरीक या उपक्रमांना उत्सुर्त प्रतिसाद देत असुन त्यामाध्यमातुन गणेशोत्सव राज्य उत्सवाची ही कल्पना समाजतील सर्व घटकांपर्यंत पोचविन्यात पोलीस प्रशानास यश येत असल्याचे दिसुन येत आहे.