प्रतिनिधी- स्वप्नील कदम
दि पुना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेची स्थापना दिनांक २०/०६/१९२० रोजी स्वातंत्र्य पूर्व काळात झाली आहे. संस्थेचे गेल्या १०५ वर्षात दर दहा वर्षांनी सुमारे १००० नवीन सभासदांची वाढ होत गेली असून सध्या संस्थेचे एकूण १४,८८३ सभासद आहेत.
संस्थेचे सध्याचे भागभांडवल व संचित ठेवी एकूण रूपये ४०८ कोटी ५१ लाख आहे. सभासद व सेवानिवतृत्त सभासद यांच्या एकूण ८२ कोटी ४६ लाख रुपये इतक्या मुदत ठेवी आहेत. संस्थेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३२८२ कोटी इतकी वार्षिक उलाढाल झालेली आहे. संस्थेने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ९४९ कोटी १३ लाख इतके कर्ज वितरीत केलेले आहे.
* संस्थेचे विविध योजना-*
१) कर्ज योजना :-लाख मर्यादा व्याजदर ९.४०%
अ) सर्वसाधारण कर्ज २१ –
१ लाख गर्यादा व्याजदर ९.४०%
२) गृह कर्ज योजना :-ब) तातडी कर्ज ५० लाख मर्यादा, व्याजदर ९.८०%
३) तारण कर्ज योजना५० लाख मर्यादा, व्याजदर ९.८०%
४) शैक्षणिक गुणवत्ता बक्षिस योजना (अ) १० वी ९७% व त्यापुढे लॅपटॉप, ९५% व त्यापुढे – टॅब (ब) १२ वी ९७% व त्यापुढे लॅपटॉप, ९५% व त्यापुढे टॅब (क) पदवी / पदविका ९७% व त्यापुढे लॅपटॉप, ९५% व त्यापुढे टॅब,
संस्थेचे संचालक मंडळातून पदाधिकारी बैठक पार पडली, सदर संचालक मंडळ पदाधिकारी निवडणूक अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर पदाधिकारी निवडणुकीत संस्थेचे अध्यक्षपदी उदयकुमार सुदाम काळभोर यांची, उपाध्यक्षपदी सुमित लहू कदम यांची, मानद सचिव पदी जमीर बाबालाल तांबोळी यांची तसेच खजिनदार पदी दिनेश प्रल्हाद गडांकुश याची निवड झालेली आहे.