पुणे

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महिला सक्षमीकरण व सबलीकरण कार्यशाळा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला सक्षमीकरण व सबलीकरण’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शामल दिदी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.

स्त्रियांच्या जीवनातील गुंतागुंत लक्षात घेतली तर सर्वात जास्त ताणतणावाला तिला सामोरे जावे लागते. स्त्रियांकडे उपजत असणाऱ्या प्रतिकार क्षमतेमुळे त्या कठीण परिस्थितीला तोंड देत असतात. कुटुंब, समाज व राष्ट्र यांच्या निकोप वाढीसाठी महिलांचे जीवन ताणतणावविरहित असावे. त्यातून महिला सबलीकरण व सक्षमीकरण साध्य होईल. असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शामल दिदी यांनी केले.

महिला सबलीकरणात शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री आर्थिक स्वावलंबनामुळे ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते. आरोग्य आणि पोषण याची जाणीव तिला सक्षम बनवते. प्रत्येक स्त्रियांना क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.

शामल दिदी यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन, डॉ. सविता कुलकर्णी यांनी आत्मविश्वास आणि स्वओळख, प्रा. संगीता देवकर यांनी भावनिक बुद्धिमता, प्रा. मनीषा गाडेकर यांनी सायबर सुरक्षितता कायदेशीर ज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शशिकला वाल्मिकी व डॉ. निताकांबळे यांनी गटचर्चा घडवून आणली. या कार्यशाळेत ३०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पवार व डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार प्रा. शैलजा धोत्रे यांनी मानले.