पुणे

२० जुलै २०२० चा ग्राहक कायदा ग्राहकराजा साठी वरदान

प्रतिनिधी स्वप्निल कदम

शनिवार दि. 20/11/2021 रोजी यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानची उत्तर महाराष्ट्राच विभागीय आढावा बैठक पार पङली .
या बैठकीत सन्माननीय संस्थापक अध्यक्ष सूर्यकांतजी गवळी साहेब, माजी मंत्री ग्राहक कल्याण सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
तसेच संस्थेच्या राज्याच्या महिला अध्यक्षा ॲड. अनिता सुर्यकांत गवळी या देखील उपस्थित होत्या. राज्याच्या उपाध्यक्षा सुरेखाताई हिरे व राज्याचे उपाध्यक्ष व निरीक्षक उत्तर महाराष्ट्र विभाग  मंगल ताई मोरे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची सूत्रे सन्मानीय अध्यक्षांच्या हाती सोपविण्यात आली.

यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे येत्या काळातील ध्येय व धोरण काय असेल.. यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान हे ग्राहक कायद्याचा इतिहास व कार्यप्रणाली सन्माननीय अध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर समजावून सांगितले व 20 जुलै 2020 चा नवीन आलेला ग्राहक संरक्षण कायदा हा ग्रामीण व शहरात घरोघरी सर्वसामान्य पर्यंत नेण्याचा संकल्प करण्यात आला, ग्राहकांचे हक्क व कर्तव्य समजावून सांगण्यात आले.

शासकीय योजना आपल्याला यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान मार्फत घरोघरी कसे पोच करता येतील व येत्या काळात ग्राहकाला आधार देण्यासाठी यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांनी पुढे यावे असे अध्यक्षीय भाषणात सूर्यकांत गवळी यांनी आवाहन केले.
तसेच राज्याच्या महिलाध्यक्षा अनिता गवळी यांनी ग्राहकांच्या सुरक्षेबाबत ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहाराबाबत कशी काळजी घ्यावी याबाबत माहितीपर मार्गदर्शन केले.

मराठवाडा विभागाच्या नियुक्त्यांमध्ये काही फेरबदल तसेच नवीन संघटनात्मक व जबाबदारीची पदे आजच्या या कार्यक्रमात दिली गेली.

प्रदेश उपाध्यक्ष पदी सुरेखाताई हिरे (रा.नाशिक) , प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक – उत्तर महाराष्ट्र विभाग पदी  मंगलाताई मोरे (रा.धुळे) तर अध्यक्ष – धुळे तालुका वैशाली राजेश खैरनार यांची निवड, उपाध्यक्ष – धुळे जिल्हा शकील पटेल , तर राज्य कार्यकारणी सदस्य  सुनिता मुकुंद मांडगे यांची निवड, तर धुळे शहर – अध्यक्ष श्रीमती. स्मिता श्याम खैरनार इत्यादी पदभार महिला विभागाला देण्यात आला .

तर पुरुष विभागावर : अध्यक्ष- उत्तर महाराष्ट्र अङॅ. सुरेश रामभाऊ आव्हाड (नाशिक) यांची तर सल्लागार- नाशिक शहर शेख मुस्ताक गुलाब यांची निवड , तर संघटक- नाशिक शहर  संतोष निवृत्ती धात्रक यांची निवड , तर नाशिक कार्यकारणी- सदस्य सोमनाथ विठ्ठल धात्रक यांची निवड .
अध्यक्ष – अहमदनगर शहर मनपा, धुमाळ प्रताप धनसिंग यांची निवड, तर धुळे विभागात अध्यक्ष- धुळे शहरावर  राजेश अशोकशेठ दुसाने यांची निवड, तर अध्यक्ष – धुळे तालुका  संदीप जगन्नाथ ठाकूर यांची निवड, तर प्रभारी अध्यक्ष – जळगाव ग्रामीण,  प्रज्वल लक्ष्मण चव्हाण यांची निवड, तर संघटक- दिंडोरी तालुका  अभिषेक शांताराम विधाते, तर संपर्क प्रमुख- नाशिक (जिल्हा ग्रामीण) सोनू रमेश काठे यांची निवड……इत्यादी मान्यवरांचे या कार्यक्रमात काहींच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश पातळीवरती केल्या गेल्या.तर काहींच्या नियुक्त्या विभागीय पातळीवरती, जिल्हायावर व तालुकास्तरावर करण्यात आल्या.

वरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे राज्यांकङुन मनापासून सर्वांचे खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा .