पुणे

पुण्यात क्रूर हत्या! मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाला 10 जणांनी ठेचून मारलं |

पुण्यात पुन्हा एकदा क्रूरतेचा कळस गाठणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune मधील कोथरूड परिसरात २३ वर्षीय तरुणाची केवळ एका मैत्रीच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्याची एका अल्पवयीन मुलीशी मैत्री होती. मात्र या मैत्रीला मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता.
१४ मार्च रोजी मुलीच्या मोबाईलवरून नागेशला भेटायला बोलावण्यात आलं. आपल्या मैत्रिणीला भेटायला जातोय असं समजून नागेश कोथरूडमधील एसएनडीटी परिसरात पोहोचला. पण तिथे आधीच दबा धरून बसलेल्या १० जणांच्या टोळीने त्याच्यावर लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.

धक्कादायक म्हणजे आरोपींनी नागेशच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन करून, “तुझ्या मुलाला मारलंय, येऊन घेऊन जा नाहीतर फेकून देऊ,” अशी धमकी दिली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नागेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह १० जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप आणि तणावाचे वातावरण आहे.