पुणे

रनोहोलिक्स ग्रुपची दक्षिण आफ्रिकेतील कॉमरेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी उत्तुंग भरारी

संपूर्ण जगात खडतर समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेत ११ जून २०२३ रोजी झालेल्या कॉमरेड्स ह्या ८७.७ किलोमीटर अंतराच्या आव्हानात्मक अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये रनोहोलिक्स ग्रुपच्या १७ सदस्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. कॉमरेड्स मॅरेथॉन २०२३ या स्पर्धे मध्ये जगभरातून २२००० धावपटू तर भारतातून ४०३ धावपटू सहभाग घेतला होता . पुण्यातून ३५ धावपटू सहभागी होते त्यातील १७ धावपटू हे फक्त रनोहोलिक्स ग्रुपचे होते. पीटरमेरीट्सबर्ग ते डर्बन ८७.७ की.मी. चे डाऊन हिल अंतर बारा तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असते.

डॉ. योगेश सातव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले वर्षभर ह्या स्पर्धेसाठी तैयारी केली गेली. डॉ. योगेश सातव ह्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. योगेश गायकवाड ,डॉ. विठ्ठल सातव, रश्मी सातव, डाॅ. शंतनु जगदाळे, स्वप्नील चिमोटे, डाॅ. मदनलाल हजारे,डाॅ. शरद इंगळे, डाॅ. सुधीर वडगावकर, विनोद बोरोले, शशांक टिळेकर, डाॅ. दिलीप माने, डाॅ.राजेंद्र साळुंखे, डाॅ.वरद देवकाते, श्याम हिगासे, डाॅ. वरुण देवकाते, डाॅ.निला मेहता ह्यांनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सखोल अभ्यासा अंती बनविलेले मासिक रनिंग प्लान्स, लॉंग रन्स व नियमित शिस्तबद्ध व्यायाम रनोहोलिक्स ग्रुपतर्फे करुन घेण्यात आले.

विशेष म्हणजे डॉ योगेश सातव ह्यांनी केवळ ७ तास ४८ मिनिटात ८७.७ किमीचे अंतर पार करुन विक्रमी कामगिरी केली. मागील वर्षी कजाकिस्तान येथील आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन या अतिशय कठीण स्पर्धेत रनोहोलिक्स ग्रुपच्या याच काही सदस्यांनी दैदीप्यमान यश मिळविले होते . या यशामुळे शहरातून यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.