पुणे

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन लॉक डाऊन काळात दिला मदतीचा हात कर्तव्य समजून प्रभाग 41 मध्ये धान्य, अन्न वाटप हेमलता परदेशी यांचा पुढाकार

पुणे (प्रतिनिधी)
कोरोना विषाणू च्या या संकट समयी राजपूत समाज सेवा विकास मंच च्या उपाध्यक्षा व शिवसेना प्रभाग क्र. ४१ हडपसर विधानसभा मतदारसंघ च्या उपाध्यक्षा हेमलता परदेशी यांच्या तर्फे गेल्या ३० दिवसांपासून रोज गरीब व गरजूंना धान्य तसेच जेवणाचे डबे वाटपाचे कार्य करत आहेत.
महाराणा प्रताप सिंह जयंती दिनी १०० कुटुंबांना गहू, तांदूळ व तेल पाकीट चे वाटप करण्यात आले याकामी राजपूत मंच चे अध्यक्ष सुभाष परदेशी, संतोष परदेशी, हेमंत परदेशी, नरेंद्र परदेशी, शैलेश राजपूत, सुरेखा परदेशी, पायल परदेशी, आरती परदेशी, सुरज परदेशी ह्यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच आदर्श नगरसेविका संगिताताई ठोसर, जयंत परांजपे, तनुजा डफळे, सागर ननावरे,
राजू परदेशी, दिलीप शेठ मुंदडा, शरदजी सारडा, आशिष बिहानी, कैलाश जी दुबे, समीरा राऊल या दानशूरांनी भरीव मदत केली आहे. तसेच आदरणीय पुरुषोत्तम लोहिया ग्रुप याकामी रोज १०० किलो खिचडी
पुरवूण अतुलनीय सहकार्य करत आहेत. या सर्वांचे आभार. मानून हा उपक्रम लॉकडाउन संपेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे हेमलता परदेशी यांनी सांगितले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x