पुणे

दिल्लीपाठोपाठ पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडली, पुढील दोन दिवस हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित राहणार,हवामान खात्याचा अंदाज…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुण्यामध्ये सध्या वातावरणात फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसत आहेत,कारण सकाळच्या वेळेस कडक थंडी दुपारच्या वेळी कडक ऊन तर संध्याकाळी ढगाळ वातावरण असे वातावरण होत आहे, यामुळे काही क्षणात वातावरण बदलत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे,त्यामुळे आता पुण्यातील हवा काही दिवस प्रदूषित राहणार असल्यांचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिल्लीत सध्या हवेतील प्रदूषणाचे प्रमाण खूपच खालावले आहे, असे असताना आता यामध्ये पुण्याचा देखील क्रमांक लागत आहे, धुलिकणांचे प्रमाण वाढल्याने शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे,पीएम 2.5 ची मात्रा अधिक आहे. आरोग्याच्या दृष्टीने पुण्यातील हवेची पातळी धोकादायक बनत आहे.

यामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे तसंच थकवा जाणवत आहे. यामुळे हे चिंताजनक आहे,त्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी, शारीरिक परिश्रमाचे काम टाळावे, जास्त वेळ बाहेर राहणे टाळावे, सोबतच बाहेर पडत असल्यास मास्कचा वापर करावा, असा सल्ला दिला जात आहे, यामुळे पुणेकरांना काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे.