प्रतिनिधी – स्वप्नील कदम
पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पुणे फेस्टिव्हलचा करंडक सलग दुसऱ्या वर्षी येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला.
व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील महाविद्यालयांत चुरशीचा सामना झाला. त्यामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाने विजेतेपद मिळवले. स्पर्धा २५ ते ६० आणि ६१ प्लस अशा दोन वयोगटांत झाली. मराठी, हिंदी तसेच गझल-सुफी गटांमध्ये एकूण २५ स्पर्धकांनी अंतिम फेरीत सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या अतिरिक्त आयुक्त. (गुन्हे अन्वेषण) पंकज देशमुख, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला.
हा करंडक पटकावल्यानंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू प्रा.डाॅ. रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.अतुल पाटील यांनी सहभागी संघाचे अभिनंदन केले आहे.