पुणे

पुण्याचे हरीश्‍चंद्र टेमगिरे यांना “योगरत्न पुरस्कार – २०२५”; शिक्षक दिनी बंगलोरमध्ये होणार गौरव सोहळा

बंगळुरू, दि. १ सप्टेंबर – शिक्षक दिनाच्या पावन निमित्ताने (५ सप्टेंबर २०२५) बंगलोर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात पुण्याचे योगप्रेमी श्री. हरीश्‍चंद्र टेमगिरे यांना प्रतिष्ठित “योगरत्न पुरस्कार – २०२५” जाहीर झाला आहे.

हा सोहळा रोटरी बंगलोर ग्लोबल योगा, रोटरी क्लब ऑफ बंगलोर कल्याण आणि योगा युनिव्हर्सिटी ऑफ द अमेरिकाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यात योगरत्न, योग ज्योती आणि योगश्री हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून, योग क्षेत्रातील असामान्य कार्य, निष्ठा आणि उत्कृष्टतेच्या सन्मानार्थ देश-विदेशातील २० हून अधिक योग साधकांचा गौरव केला जाणार आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण – सर पुत्तण्णा चेट्टी टाउन हॉल, जे.सी. रोड, बंगलोर, वेळ – दुपारी ३ वाजता, दिनांक – ५ सप्टेंबर २०२५ अशी आहे.

योगरत्न पुरस्कार विजेते (२०२५):

श्री. नगराज एस. हुन्सीमरडा (दुबई)

श्री. तिरुनम सुब्रमण्यम (आंध्रप्रदेश)

श्री. पगडला चंद्र शेखर (आंध्रप्रदेश)

श्री. हरीश्‍चंद्र टेमगिरे (पुणे, महाराष्ट्र)

डॉ. एम. नरताजन (मदुराई, तामिळनाडू)

श्री. जे. संपथकुमार (कोयंबटूर, तामिळनाडू)

याचबरोबर योग ज्योती आणि योगश्री पुरस्कार विजेत्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे.

हा सोहळा हा केवळ योगाच्या उत्कृष्टतेचा उत्सव नसून, गुरु–शिष्य परंपरेला वाहिलेली आदरांजली आहे. समाजाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी योगाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवणाऱ्यांचा हा गौरव आहे.