पुणे ः सरकारी कामात अडथळा आणल्याचे सांगून स्टेशन डायरी करून पोलिसी हिसका दाखवते, अशा शब्दात अलका चौक वाहतूक शाखेतील महिला पोलीस पवार यांनी ज्येष्ठ नागरिकाची अवहेलना केली. ज्येष्ठ नागरिकांशी कसे बोलावे याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला पोलिसांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे अप्पा बळवत चौकातील जमलेल्या नागरिकांनी सांगितले. अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे, असा सूर नागरिकांनी आळवला.
लक्ष्मी रोड कुंटे चाकातून नो पार्किंगमधून वाहन उचलल्यानंतर लगेचच ऑनलाइन ५०० रुपयांची पावती संबंधित वाहनचालकाला दिली. वाहन अलका चौक येथे आणून साखळीबंद लॉक केले. तेथील वाहतूक पोलिसाकडे चौकशी केली असता, टोईंग वाहनवरील महिला पोलीस पवार यांच्याकडे चावी असून, त्या आल्यानंतरच दिली जाईल असे सांगितले. ही घटना शुक्रवार (दि. ११ जुलै) सायंकाळी ५.२० मिनिटांनी घडली. कुंटे चौकातून वाहतूक पोलिसांनी वाहन उचलल्यानंतर ४.४८ वा. ऑनलाइन पावती केली.
दरम्यान, तेथील एका सेवकाने इतर वाहने सोडून दिली, मग चावी त्यांच्याकडे कशी असे विचारताच बनसोडेंच्या सहकाऱी म्हणाले आम्हाला माहिती नाही, तुम्ही कशाला आला. वाहन दिल्यानंतर अप्पा बळवंत चौकात टोईंगचे वाहन सिग्नलला समोरच्या बाजूला पदपथालगत (वेळ ५.३० वा.) उभे करून महिला कर्मचारी गाडीत चहा पित होत्या. त्यावेळी ते वाहन पार्किंगमध्ये नव्हते, त्यांना काही नियम नाहीत का. पवार यांच्याकडे चावीविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, हे बघा गाडी सोडली यात गोड मानून घ्या. पैसे घेतल्याशिवाय आम्ही गाडी सोडत नाही. गाडीतून उतरून दुचाकीसमोर आडव्या उभ्या राहून माझे आयकार्ड घेऊन फोटो काढून घेतला आणि स्टेशनडायरी करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करते. महिला कर्मचारी असल्याने पुरुष बिचारे काहीच बोलू शकले नाहीत. ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना करून त्या टोईंग वाहनाकडे निघून गेल्या. अप्पा बळवंत चौकात थांबलेल्या ठिकाणची सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातरजमा करून पोलीस खात्याचे नाव बदनाम करणाऱ्या महिला पोलिसावर कारवाई केली पाहिजे, असे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड, प्रशांत कराळे, मनोज सुतार, अभिजित यादव, अनिकेत गरदडे, विशाल काळाणे, राहुल कोंडे यांनी सांगितले.
कुंटे चौकातील रस्त्यालगत वाहतुकीला वा वाहनांना अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी दुचाकी उभी केली होती. त्यावेळी चौकात दोन वाहतूक पोलीस आणि वॉर्डनही कर्तव्यावर होते. तेव्हा त्यांनी ही बाब त्या दुचाकीचालकाच्या निदर्शनास का आणून दिली नाही, ही मोठा प्रश्न आहे. म्हणजे चूक करू द्यायची आणि लगेच त्याच्यावर कारवाई करायची असा अलका चौक वाहतूक विभागाचा अजब कारभार दिसून आला.
वाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्यासाठी टोईंग वाहन रस्त्यात उभे करून वाहतूककोंडी होते याचेही भान असले पाहिजे. वाहने उचलून वाहतूक सुरळीत नाही, त्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, ते वाहतूक विभागाकडून होताना दिसत नाही.
अॅड. व्ही. व्ही. बोरकर, पुणे