पुणे:
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांना विकासाच्या गाजराने भुलवून प्रत्यक्षात कराचा दंड व सावकारी व्याज लावून लुटले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे.
या लुटीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “गाजर आणि रताळी आंदोलन” करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका मुख्यालय, शिवाजीनगर येथे हे आंदोलन पार पडले.
मांजरी बुद्रुकसह समाविष्ट ३२ गावांतील मिळकतधारकांना ४०% सवलतीचे आमिष दाखवले गेले. मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस विकास झालेला नाही. उलट नागरिकांकडून २% दंड व व्याज लावून आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
प्रशांत जगताप यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की, “जर नागरिकांवरील अन्याय थांबवला नाही, तर आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन उभारले जाईल.”
या आंदोलनात पुढील नेत्यांची उपस्थिती होती –
रवींद्र माळवदकर, उदय महाले, आशाताई साने, गजेंद्र मोरे, किशोर कांबळे, वैशाली थोपटे, दिलशाद अत्तार, पूजा काटकर, रमिझ सैय्यद, असिफ शेख, गणेश नलावडे.
महापालिका व महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुणेकरांना दिलेल्या विकासाच्या आश्वासनांची फसवणूक झाल्याचा ठपका यावेळी ठामपणे ठेवण्यात आला.