पुणे

उसने पैशाच्या देवाणघेवाण मधून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून – मांजरी खुर्द मधील घटनेने खळबळ

पुणे  :  –

 मित्राचे हात उसने घेतलेले पैसे परत का करत नाही, असे विचारायला गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून  करण्याचा प्रकार मांजरी खुर्द येथील स्मशानभूमीजवळ घडला.

विकास लक्ष्मण सोनवणे (वय ३१, रा. मांजरी खुर्द) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ) पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सानवणे हा इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होते. आरोपींनी विकास याचा मित्र गायकवाड याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते.
आरोपी हे पैसे परत करत नसल्याने रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला होता.
त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विकास आरोपींच्या घरी गेला.
त्यांना पैसे परत का करत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींबरोबर वाद झाला.
त्यातून पाच जणांनी विकासवर वार करुन त्याचा खुन केला.
लोणीकंद पोलीस अधिक तपास  करीत आहेत.