पुणे

हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडत भाजपात करणार प्रवेश : जागांच्या वाटपात मध्ये पुण्याची गणिते बदलली ; पुण्यात दोन जागा सेनेला, हडपसर चा समावेश?

पुणे – (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याती माजी सहकार मंत्री भाजपात प्रवेश करणार असल्याने इंदापूर मध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. मुंबईमध्ये आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील उद्या कमळ हाती घेणार आहेत. दरम्यान हर्षवर्धन हे भाजपच्या वतीने लढणार असून इंदापूरच्या सेनेची जागा त्यासाठी सोडण्यात येणार आहे या बदल्यात पुणे शहरात भाजपच्या आठ विद्यमान आमदारांपैकी 1 जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये हडपसर ,खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदार संघाची नावे घेतली जात आहेत, मूळ पुण्यातून सेनेचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी 1 जागा आणि इंदापूर च्या बदल्यात 1 जागा अशा या ३ मधून २ मतदार संघांतून शिवसेनेला लढण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी 4 सप्टेंबरला जलसंकल्प मेळावा घेतला होता. यावेऴी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करावा आणि विधानसभा लढवावी असे समर्थकांचे म्हणणे होते. अखेर उद्या हर्षवर्धन पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाची मागणी केली होती. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हडपसर, खडकवासला, वडगावशेरी विद्यमान चिंतेत
भाजप शिवसेना युतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्कामोर्तब केले, अन राज्यातील हालचाली वाढल्या त्यातच काँग्रेसचे मातब्बर नेते हर्षवर्धन पाटील भाजपात प्रवेश करीत असल्याने सेनेच्या वाट्याची इंदापुरची जागा, उस्मानाबाद, भाजपला सोडल्या जाणार जागा बदल व पुण्यात शिवसेनेची ताकद पाहता आठ पैकी दोन मतदारसंघ सेनेला सोडले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, हडपसर, खडकवासला, वडगावशेरी यापैकी दोन जागा सोडणार असल्याने योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक यांची धाकधूक वाढली आहे.

हडपसर मधून महादेव बाबर की प्रमोद भानगिरे ?
हडपसर विधानसभा मतदारसंघात महादेव बाबर यांनी पाच वर्षे आमदार म्हणून नेतृत्व केले आहे, ते पुन्हा इच्छूक आहेत, त्यातच नगरसेवक नाना भानगिरे यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्यामार्फत जोरदार फिल्डिंग लावली आहे, मागील निवडणुकीत मनसेत जाऊन भानगिरे यांनी विधानसभा निवडणूक लढविली त्याचा फटका सेनेला बसला अन भाजपचे टिळेकर निवडून आले, शिवसेनेत तानाजी लोणकर, समीर तुपे यांच्यासह अनेक इच्छूक असले तरी खरी स्पर्धा बाबर अन भानगिरे यांच्यात आहे, मातोश्री कोणाला कौल देणार यावर पुढील गणित अवलंबून आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
4 years ago

Hi there very cool web site!! Man .. Beautiful .. Amazing .. I’ll bookmark your web site and take the feeds additionallyKI’m happy to search out so many useful information right here within the put up, we need develop extra strategies on this regard, thanks for sharing. . . . . .

4 years ago

I’d always want to be update on new articles on this site, bookmarked! .

Comment here

2
0
Would love your thoughts, please comment.x
()
x