पुणे

विजय मोरे यांना पितृशोक : झुंबरराव मोरे यांचे आकस्मिक निधन

हडपसर
सामाजिक कार्यकर्ते आणि लोकहितासाठी झटणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे विजयभाऊ मोरे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील, झुंबरराव मोरे यांचे (11 जुलै 2025) रोजी (86 वर्षे) आकस्मिक निधन झाले.
झुंबरराव मोरे हे शांत, पण तत्वनिष्ठ आणि कुटुंबप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि संस्कारासाठी त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जात मार्ग दाखवला. त्यांच्या कष्टांच्या पायावरच विजय मोरे यांची सामाजिक वाटचाल उभी राहिली आहे. त्यांच्यामागे पुत्नी, 2 मुले 1 मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे.

या दुःखद घटनेमुळे मोरे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिक, समाजसेवक, विविध संस्था व कार्यकर्ते त्यांच्या घरी धाव घेत शोकसंवेदना व्यक्त करत आहेत.
झुंबरराव मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिनांक 11 जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी करण्यात आले आहेत. त्यांच्या निधनाने एक कष्टाळू पिढीचा आधारवड हरपल्याची भावना हडपसर परिसरात व्यक्त केली जात आहे. झुंबरराव मोरे यांची शोकसभा मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी उन्मेश मर्मवेदा वेलनेस हडपसर गाडीतळ येथे सायं. 7.00 वाजता नियोजित करण्यात आली आहे.