पुणे

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, पुण्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

मुंबई :  (Rokhthok Maharashtra Online) – Maharashtra Unlock । कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं होतं. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. त्या जिल्ह्यात मात्र हे निर्बंध असेच राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे, तिथे आम्ही करतो आहोत. जिथे करणं थोडसं अवघड आहे, तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं होतं. यावरून आता राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, उर्वरित 11 जिल्ह्यात स्तर 3 चे निर्बंध असणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे.

आताच्या नव्या नियमावलीनुसार (New regulations) सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत.
या अनलॉकच्या (Unlock) नव्या निर्णयाकडे राज्यातील नागरिकांचं आणि व्यापाऱ्याचं अधिक लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास 25 जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे.
मात्र, राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये स्तर 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे.