पुणे

पुण्याजवळचं शांत आणि सुंदर ठिकाण – रामदरा मंदिर

“पुण्याजवळ एक असं ठिकाण आहे… जिथे प्रभू श्रीराम यांनी वनवासात विश्रांती घेतली होती!”… जिथे निसर्ग, शांतता आणि श्रद्धा एकत्र येतात… आणि ते म्हणजे – रामदरा मंदिर!”
लोणी काळभोरजवळ वसलेलं हे मंदिर आज जरी सुंदर पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जात असलं… तरी त्यामागे एक खास आध्यात्मिक कहाणी आहे.
असं सांगितलं जातं की, वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी या परिसरात काही काळ विश्रांती घेतली होती… आणि म्हणूनच या जागेला “रामदरा” हे नाव पडलं.
👉 पण या ठिकाणाला खरं रूप दिलं ते अयोध्येतील धुंदीबाबांनी… ‘धुंदीबाबा’ म्हणजे अयोध्येतील श्री देवपुरी महाराज,
१९७० ते १९७५ च्या दरम्यान, धुंदीबाबांना येथे दैवी साक्षात्कार झाला… आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या डोंगराळ भागात मंदिर उभारण्यास सुरुवात केली.

आज हे मंदिर मुख्यत्वे भगवान शिवाला समर्पित असलं… तरी येथे प्रभू श्री रामाची मूर्ती आणि परिसरातील आध्यात्मिक वातावरण भाविकांना खास आकर्षित करतं.
👉 मंदिराभोवती हिरवीगार झाडी, शांत तलाव आणि डोंगरांच्या कुशीत वसलेलं वातावरण… मनाला पूर्ण शांतता देतं.
विशेषतः पावसाळ्यात, रामदरा मंदिराचं सौंदर्य अगदी स्वर्गासारखं भासतं.

👉 “जर तुम्हाला शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन शांतता अनुभवायची असेल… तर रामदराला मंदिराला एकदा नक्की भेट द्या!”