पुणे ः प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे पुष्पगुच्छ किंवा हारही आणता आला नाही. मात्र, शैलेंद्र श्रीवास्तव आणि रेणुका श्रीवास्तव यांनी साधेपणाने 50 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याचीभावना व्यक्त केली. दरम्यान, पोलीस आणि कोविड पोलीस मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी केक कापून आनंद साजरा केला.
अमानोरा सिटीमध्ये श्रीवास्तव दाम्पत्य राहत असून, त्यांचे कुटुंबीय अमेरिकेमध्ये आहेत. मात्र, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे त्यांना येता आले नाही. त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा कोविड पोलीस मित्र आणि मंडळींनी व्यक्त केली. त्यानुसार हडपसर पोलीस स्टेशनचे तानाजी देशमुख आणि चौधरी यांनी श्रीवास्तव यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अमेरिकास्थित मुलांनी पुण्यातील अमानोरा सिटीमधील आई-वडिलांचा 50 वा लग्नाचा वाढदिवस फेसबुकवर साजरा करून केक कापून कापला. यावेळी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार तानाजी देशमुख आणि नितीन चौधरी, अमानोरा सिटीचे सीईओ कर्नल राजेश चौधरी, स्नेहल जोशी, तसेच कोविड पोलीस मित्र अॅड. परमेश्वर वाघमारे-पाटील, दर्शक सोळंकी, सॅमसन मस्से, ममता मंगलानी, शुभांगी भारती आणि सोसायटीतील मोजक्या मंडळींची उपस्थित होती.
रेणुका श्रीवास्तव म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे मुले अमेरिकेत अडकली आहेत. मात्र, तुम्ही सर्वांनी आवर्जून आमच्याकडे येऊन आमचा 50 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आता गर्दी करता येत नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसमधून आपण सगळेजण लवकरच बाहेर पडणार आहेत. त्यानंतर सगळ्यांनी माझ्याकडे जेवणासाठी आवर्जून यायचे असे त्यांनी सांगितले.