पुणे… आयटी सिटी… शिक्षणाचं केंद्र…
पण आता एक वेगळंच चित्र समोर येतंय…
रस्ते झालेत मृत्यूचे सापळे!
कोंढवा, वानवडी… आणि आता हडपसर!
भरधाव टँकर आणि डंपरने
पुन्हा एकदा घेतलाय एक बळी…
हडपसरमधील रविदर्शन चौकाजवळ
गुरुवारी दुपारी सुमारे १:४५ वाजता
प्रतीक शेठ (वय ४३) आपल्या दुचाकीवरून जात होते…
मागून आलेल्या भरधाव टँकरने
त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली!
धडक इतकी भीषण होती की
प्रतीक रस्त्यावर कोसळले…
आणि सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे –
चालकाने वाहन थांबवण्याऐवजी वेग वाढवला!
टँकरचं चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेलं…
आणि काही क्षणातच सर्व काही संपलं!
प्रतीक…
कोणासाठी पती, कोणासाठी मित्र…
तर कोणासाठी आयुष्याचा आधार होते…
त्यांच्या मित्र नितीन बंबोली म्हणतात –
“तो फक्त मित्र नव्हता…
तो माझ्या आयुष्याचा भाग होता…”
अपघातानंतर चालकाने
आपले नाव अविनाश जाधव सांगितले…
पण गोंधळाचा फायदा घेत तो फरार झाला!
स्थानिकांचा आरोप –
वेळेत रुग्णालयात नेलं असतं तर जीव वाचला असता!
या प्रकरणात पोलिसांनी
चालक आणि टँकर मालक उमेश जाधव
दोघांनाही अटक केली आहे.
तपासात धक्कादायक बाब समोर आली –
अवजड वाहन असूनही
ना 360 कॅमेरा… ना आवश्यक सुरक्षा उपाय!
प्रश्न अजूनही तोच आहे –
👉 पुण्यातील रस्ते अजून किती बळी घेणार?
👉 प्रशासन कधी जागं होणार?
एक निष्काळजीपणा…
आणि एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त!
