पुणे

प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे यांचे निधन

मांजरी खुर्द ता.हवेली जि. पुणे येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे ( वय वर्षे 58) यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सांप्रदायिक क्षेत्राची आवड असणारे आव्हाळे यांनी अनेक वर्षे पंढरपुरची पायी वारी केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,दोन भाऊ , पुतणे,भाऊजया, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे मा.अध्यक्ष, साप्ताहिक ज्ञानलिलाचे उपसंपादक अशोकराव काशिनाथ आव्हाळे व दत्तात्रय काशिनाथ आव्हाळे यांचे ते मोठे बंधु होत. तसेच मांजरी खुर्दच्या मा.उपसरपंच सुनिता अशोकराव आव्हाळे यांचे ते मोठे दिर होत.