पुणे

झिरवळांची विकेट पडणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठी चर्चा

मंत्री नरहरी झिरवळ यांच्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट बैठकीपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या.

झिरवळ यांनी प्री-कॅबिनेट बैठकीला दांडी मारली, तसेच ते मुख्य मंत्रिमंडळ बैठकीलाही गैरहजर राहिले. यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा आणखी रंगू लागली आहे.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा झाली. पक्ष झिरवळ यांना साथ देणार की त्यांचा राजीनामा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओ प्रकरणात ब्लॅकमेलिंगचा आरोप समोर आला असून, संबंधित व्यक्तीच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ एडिट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींमुळे नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.