समृद्धी महामार्गावर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे…
जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ भीषण अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मजूर महिलांना घेऊन जाणारा मिनी पिकअप रस्त्याच्या कडेला उभा असताना… मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, आठ जणींना जीव गमवावा लागला… तर 5 जण गंभीर जखमी आहेत.
घटनेनंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण समोर आले आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार Arjun Khotkar यांनी जखमींची भेट घेतली… तर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय…
समृद्धी महामार्गावर वेगाला लगाम कधी बसणार?
