तेलंगणातील करीमनगरमधून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. रोजंदारीचे काम मिळेल, असे सांगून एका ५५ वर्षीय महिलेला तरुणाने निर्जन शेतात नेल्याचा आरोप आहे.
आरोपानुसार, महिलेचे दागिने लुटल्यानंतर तिला थेट विहिरीत ढकलण्यात आले. धक्कादायक म्हणजे, तब्बल २१ तास मृत्यूशी झुंज देत महिलेने विहिरीतच जीव वाचवण्यासाठी संघर्ष केला.
अखेर दुसऱ्या दिवशी स्थानिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर महिलेला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी २१ वर्षीय दिनेश रेड्डी याच्यावर लुटीचा आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
